Friday, August 14, 2009

हो मी चुकलो ....

हो मी चुकलो ..मान्य आहे ...
चुका कोण करत नाही ... म्हणुन एवढी मोठी शिक्षा?

जोरदार पाउस पडतो ....सर्व दिशेने पुर येतो ..पावसाचा दोष असतो .... तरी पण आपण पावसाची वाट बघतोच ना ...
कधी तरी समुद्र खवळतो ... सुनामी येते .... म्हणुन काय आपण समुद्रावर जाणे सोडतो ...

चुका सगळेच करतात .... म्हणुन काय त्याना एवढी मोठी शिक्षा द्यायची?

Tuesday, August 11, 2009

प्रेमाचा जमाखर्च ....

आज तुझ्या मनात जे काही आहे ते सांगुन टाक ...
चल आज तू आपल्या प्रेमाचा जमाखर्च मांडून टाक ....

ऑफिसचा जमाखर्च रोजच करतेस...एक दिवस आपल्या प्रेमाला दे ...
त्या जमाखर्चात माझ्या ऐन तारुण्याच्या पहाटेची वर्षे मांडून दे ....

मग आपण बघू कोण फायद्यात आहे...कोण तोट्यात आहे ते .....
पण विसरु नकोस, प्रेमात मात्र दुसर्याच्या फायद्यात आपले सुख असते ....

अग वेडे ...असे हिशोब कधी एका दिवसात जुळत नसतात ....
जोडलेली नाती अशी एका दिवसात तुटत नसतात ...

Thursday, August 6, 2009

ओंजळ ... आपल्या प्रेमाची

काल तू म्हणालीस ...ओंजळीमधून पानी कधीच गेले गलून .. राहिला फ़क्त ओलावा ....
अग वेडे ... आपले प्रेमाचे घरटे आहे खुप जुने ... त्याला हा आपला परत नव्याने गिलावा ...

पाणी गेले वाहून ...पण अजुन ओंजळ तर शाबूत आहे ....याला कमी समजू नकोस ....
पाण्याचे काय ...ते परत पण येइन ...विश्वास ठेव .... ओंजळ मात्र सोडू नकोस ...

प्रेमामध्ये ओली सुकी चालूच असते ... आपण फ़क्त प्रेम करायचे ....
एकमेकांच्या प्रेमात सम्पूर्ण जग विसरून जायचे ....

- रविहास

तुझी साथ ...

तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण एका आयुष्याएवढा वाटतो ....
तू हरवशील या भीतीने माझा प्रत्येक श्वास शरीरात येतानाच घाबरतो ....

तुला केलेला प्रत्येक फ़ोन म्हणजे माझ्यासाठी सुखाची पर्वणी असतो ....
फ़ोन मधून पण तुझ्या शरीराचा गंध माझ्या नाकात जावून बसतो .....

तुला केलेला प्रत्येक SMS म्हणजे माझ्यासाठी एक पवित्र ओवी असते ....
कितीही वेळा ती वाचली तरी मन भरत नसते .....

तुझी प्रत्येक भेट मला एक नवीन अनुभव देवून जाते ....
प्रत्येक भेटीनंतर तितकीच तू माझ्या मनात खोल रुजत जातेस ...

तुझ्याशिवाय रहाण्याची कल्पना करवत नाही ... तुझ्याशिवाय राहण्यासाठी मन धजावत नाही ...का इश्वाराने ही वेळ आपल्यावर आणावी .... इतके प्रेम असून पण एकत्र रहाण्याची मुभा नसावी ...

- रविहास

चाफा ...

मी मेल्यावर माझ्या चितेजवळ चाफ्याचे फुल ठेवायचे विसरून तुला चालणार नाही ....

हे माझे शेवटचे मागणे ...आता अजुन काही तुला मागणार नाही ...

चाफ्याचे फुल नाही मिळाले तर कळी ठेवली तरी चालेल .....चितेच्या ऊबेमुले त्याला उमलायाला वेळ लागणार नाही ....

पण ... माझ्या प्रेताबरोबर त्यालाही जळायचे आहे ..हे विसरून त्याला चालणार नाही ......

- रविहास

पावसा ... पावसा ..

पावसाला सांगतो जा माझ्या प्रियेच्या अंगावर मंद सरींचा पाउस पाड .... तिला माझ्या आठवणी मध्ये धुंद करून टाक ....तिला माझ्या प्रेमाच्या पावसात भिजताना मला पाहू दे ..... तिचे मोहक रूप मला माझ्या डोळ्यामध्ये साठवू देत ...पावसा please माझे एवढे काम कर .... माझ्या मनातील प्रेमाचे सर्व बांध तुटून तिच्यावर माझ्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे ...

- रविहास

वटपोर्णिमा ....

तुज्या माज्या प्रेमाची अजब कहानी ...कुणाला सांगितले तरी विश्वास बसणार नाही ...
तुज्या प्रेमाची मला अशी साथ ... सात जन्म सुद्धा ती तुटणार नाही ...

वटपोणिमेला मला देवाकडून मागुन घे ...
मी मेलो तरी सत्यवान -सावित्री प्रमाने ... मला देवाकडून परत मागुन घे ...

या वेळाची वटपोणिमा अशी साजरी कर ...मला आयुष्यभराची साथ दे .....

- रविहास

तुझी आठवण ...

तुझे काल मला आवेगानी मीठी मारने खुप आवडले ...
त्या एका स्पर्शांत प्रेम होते , विश्वास होता , आपुलकी होती ...
खरच असे करून तू माजी तुझ्याविशायिची जबाबदारी वाढवतेस ...
प्रत्येक क्षण क्षणाला मला तू आठवतेस ...

- रविहास

तुझे दुख्ख: ...

स्वताच्या दुखाची पर्वा न करता माझ्या सुखाची प्रार्थना करतेस ...
का अशी स्वताला एकटी समजुन आयुष्याची दुख: एकटी सोसतेस ...
अग वेडे...मी तुज्यावर खुप खुप प्रेम करतो ...
तुझ्या चेहर्यामध्ये माझ्या भविष्याला बघतो ...

- रविहास

भावना ...

तू नुसती दिसणार असलीस तरी मन नाचायला लागते
हातात हात नाही घेता आला, तरी तुज्या डोळयातून प्रेम वाहताना दिसते
------------------------------------------
तू माज्या जीवनात प्रेमाचा पाउस घेउन आलीस ...
मला भिजवताना तू पण ओली चिम्ब जालीस ...
------------------------------------------
हे दिवस में आयुष्यात कधीच विसरणार नाही ....
तू इतके भरभरून देतेस की देवासमोर पण आता हात पसरणार नाही..
------------------------------------------
तू बरोबर असतेस तेव्हा मी सगळे जग विसरतो ..चल आपण आपले जग बनवुयात...
एकमेकंच्या साथीत राहिलेले आयुष्य घालवुयात....
------------------------------------------
तू मला इतके प्रेम दिले आहेस की ते मला आयुष्यभर पुरेल ..
उद्या मेलो तरी तुज्यासाठी परत शरीरात श्वास भरेल...
------------------------------------------
सकाळी तुला निरोप देताना माजे डोळे पाणावले...
बकुली चा वास इतका सुन्दर असतो हे मला सकाळीच समजले....
------------------------------------------
तुज्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण माज्यासठी फार मोलाचा आहे दोष माझा नाही ...
दोष तू दिलेल्या चाफ्याच्या फुलाचा आहे ....
------------------------------------------
तुझे झाडावर पण प्रेम करने मला आवडले...
तुझ्या प्रेमात आज मी देवाला बघितले...
------------------------------------------
या माझ्या कविता नाहीत तर माझे प्रेम आहे ...
तुला खुप प्रेम द्यायचे हा आता माझा aim आहे...

- रविहास